हवेली तालुका भाजपच्या वतीने हॉस्पिटल व्यवस्थापनांना निवेदन

वाघोली : खासगी हॉस्पिटलने इमर्जन्सी पेशंटकडून डिपॉझिट मागणी करू नये आणि शासकीय आरोग्य योजना तातडीने लागू कराव्यात अशी इशारा वजा मागणी लेखी पत्र हॉस्पिटल व्यवस्थापनांना देऊन करण्यात आली आहे.
हवेली तालुका भाजप पदाधिकाऱ्यांनी वाघोलीतील हॉस्पिटल व्यवस्थापक, डॉक्टर यांची भेट घेऊन याबाबतचे पत्र दिले. अत्यावश्यक सेवेच्या क्षणी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना डिपॉझिटच्या नावाखाली अडथळा निर्माण करणे अमानवी आहे. तसेच, अनेक हॉस्पिटलमध्ये शासकीय आरोग्य योजना अद्याप लागू करण्यात आलेल्या नाहीत, त्या तातडीने लागू करण्याचे यावेळी कळवून हलगर्जीपणा आढळल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.