डॉ. जान्हवी पाटील भाजयुमो प्रदेश उपाध्यक्षपदी

परभणी :  परभणी जिल्ह्यातील डॉ. जान्हवी अजिंक्य पाटील यांची नियुक्ती भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

डॉ. जान्हवी पाटील शासकीय महाविद्यालय नागपूर येथून एम.बी.बी.एस. झाल्या असून त्यानंतर त्यांनी मुंबईच्या नामांकित बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड सायन्स पिलानी (BITS PILANI) या संस्थेतून त्यांनी MBA चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

मेडिकल प्रॅक्टिस आणि कायदा या विषयात त्यांचे शिक्षण व अभ्यास चालू आहे. परभणीच्या सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेज व पहूत्तर संसथेच्या तसेच बी.एस.सी. नर्सिग कॉलेजच्या विश्वस्त आहेत, डॉ. पाटील व डॉ. प्रफुल्ल पाटील यांचे ३५० खाटांचे मल्टी सुपरस्पेशालिटी असून त्या पनवेल येथील लाईफ लाईन हॉस्पिटलच्या संचालिका आहेत.

डॉ. जान्हवी पाटील यांच्या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे, माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत दादा पाटील, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पाटील, नगरसेविका डॉ. विद्याताई पाटील, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. जयश्री पाटील व विलास कच्छवे यांनी डॉ. जान्हवी पाटील यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्षाने दिलेली जबाबदारी उत्कृष्टपणे सांभाळणार असून राज्यात पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

Share This:

WhatsApp
Facebook
X

Latest News

Scroll to Top