रवी शंकर प्रसाद यांचे ट्विटर खाते एक तासासाठी ब्लॉक

भारत सरकार व ट्विटर मधील वाद चिघळण्याची शक्यता

नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच ट्विटर अकाऊंट एक तासासाठी कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे ब्लॉक करण्यात आलं होत. प्रसाद यांनी ट्विट करून या बाबतीत माहिती दिली.

पूर्वसूचना न देता अकाऊंट ब्लॉक करणे हे नवीन माहिती तंत्रज्ञान 2020 च्या नियम 4 चे उल्लंघन असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

नवीन माहिती तंत्रज्ञान नियम २०२० वरून ट्विटर आणि भारत सरकार यांच्या मध्ये बराच काळापासून वाद सुरु आहे. ट्विटर हे नवीन नियम पाळायला तयार नसून त्यांना ते नियम पाळणे बंधनकारक असल्याचे भारत सरकारचे म्हणणे आहे. आत्ता घडलेल्या ब्लॉकच्या ताज्या घटनेमुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.

Share This:

WhatsApp
Facebook
X

Latest News

Scroll to Top