स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बार्शी तालुका कार्याध्यक्षपदी साहेबराव दराडे यांची निवड

हवेली तालुका भाजपच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार व्यवस्थापनांना निवेदन

बार्शीस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका कार्याध्यक्षपदी साहेबराव सुरेश दराडे (रा.भालगांव) यांची निवड करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांची निवड केली.

साहेबराव दराडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात तसेच व्यसनमुक्तीसाठी पुण्यात चांगले काम केले आहे. मात्र शेतीची आवड असल्याने त्यांनी शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागात काम सुरू केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेउन स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर त्यांची निवड करण्यात आली आहे. निवडी नंतर माजी खासदार राजू शेट्टी, माजी सरपंच राजाभाऊ चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष राहुलराजे भड, मदनलाल खटोड, राजाभाऊ काकडे, सुरेश नाना यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

साहेबराव दराडे म्हणाले, महसूल विभागातील कामाचा अनुभव असल्याने शेतकऱ्यासाठी शासनाच्या असलेल्या विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहचविण्याचे काम करणार आहे. तसेच संघटनेच्या माध्यमातून शेती करताना येणाऱ्या अडचणीतून मदत करणार असल्याचे देखील निवडीनंतर सांगितले.

यावेळी विजय यादव, योगेश काकडे, अस्लम शेख, बाळासाहेब लाटे, भारत पैकेकर तसेच गौडगांव चे ग्रामस्थ उपस्थित होते.

Share This:

WhatsApp
Facebook
X

Latest News

Scroll to Top