Video : गणित प्रदर्शनामुळे गणिताचा पाया पक्का होतो – उद्योजक उदय कोठारी

वाघोली येथील आश्रम शाळेत गणित प्रदर्शन उत्साहात संपन्न

वाघोली : माध्यमिक आश्रम शाळा वाघोली येथे दरवर्षी प्रमाणे राष्ट्रीय गणित दिवस व कै. मोतीलाल जाधव यांच्या स्मरणार्थ आयोजित गणित प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या प्रदर्शनाचे उद्घाटन मिलिंद जा धव यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून टेराडेटा कंपनी टी डी केअरचे भारतातील प्रमुख राज जी. डी. उदय कोठारी हे होते.

मेडिकल प्रॅक्टिस आणि कायदा या विषयात त्यांचे शिक्षण व अभ्यास चालू आहे. परभणीच्या सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेज व पहूत्तर संसथेच्या तसेच बी.एस.सी. नर्सिग कॉलेजच्या विश्वस्त आहेत, डॉ. पाटील व डॉ. प्रफुल्ल पाटील यांचे ३५० खाटांचे मल्टी सुपरस्पेशालिटी असून त्या पनवेल येथील लाईफ लाईन हॉस्पिटलच्या संचालिका आहेत.

यावेळी एकूण ३४ प्रकल्प आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केले होते. यावर्षीचे मुख्य आकर्षण मुलींनी गायलेली गणित विषयाची आरती व गणिताचे गाणे हे होते.

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष कोठारी यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात गणित विषयाचा ताण न घेता त्याचे आनंदाने अभ्यास करा व आपल्या शालेय जीवनातील प्रत्येक गणित प्रदर्शनात सहभाग घेऊन गणित विषय हसत खेळत समजावून घ्या असे सांगितले. शालेय जीवनात प्रत्येक स्पर्धा परीक्षेला सामोरे जा असे मार्गदर्शन केले.

यावेळी माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र सोनवणे, दगडू शिंदे, गणेश राहणे, गोकुळ शिरोरे, प्रवीण वाकडे हे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना गणित विषयाचे प्रकल्प तयार करण्यासाठी शाळेतील गणित विषयाचे शिक्षक विजय फापाळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सृष्टी हांडगर व लावण्य हांडगर या विद्यार्थिनींनी केले.

Share This:

WhatsApp
Facebook
X

Latest News

Scroll to Top